आपला जिल्हा

शिरूरच्या एसबीआय बँक कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

बीडसध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे पीककर्जासाठी शेतकरी बँकेचे मोठ्या आशेने उंबरे झिजवत आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडणे शेतकऱ्यांशी बँक कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा, जवळच्या माणसाला बँकेत प्रवेश असे एक ना अनेक बाबी शिरूर कासार येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पहावयास मिळत आहे.

शिरूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही. शेतकऱ्यांना व्यवस्थित वागणूक दिली नाही. शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा प्रश्न तात्काळ सोडलं नाही तर बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक रतन गुजर यांनी दिला आहे


पिक कर्ज मिळावे यासाठी सध्या शेतकरी प्रयत्न करीत असताना बँकेचे कर्मचारी मात्र बापाच्या घरच द्याव लागतंय अशा अविर्भावात शेतकऱ्यांशी वर्तवणूक करताना दिसून येत आहेत. अरेरावीची भाषे सोबतच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे स्टेट बँकेत पहावयास मिळत आहे. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडणे ही तर चिल्लर गोष्ट झाली आहे. बँकेच्या दारातच शेतकऱ्यांचा जमाव जमवून एकत्रित 4 –2 माणसं बँकेत सोडले जातात. ताटकळत उभा कुठपर्यंत राहायचं यासाठी शेतकरी देखील गेटच्या बाहेरच गर्दी करुन उभे राहतात. मात्र बँकेकडून सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करा असं कधीच सांगितल जात नाही. या गर्दीतही बँकेतील कर्मचाऱ्यांचा एखादा ओळखीचा व्यक्ती आलाच तर त्याला लगेच गेट उघडल्या जाते. या प्रकारामुळे मात्र वयोवृद्ध तसेच महिला वर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याची खंत शाखा व्यवस्थापकांना कधीच वाटत नाही उलट पक्षी गरज असेल तर थांबतील नाहीतर कोणी आमंत्रण द्यायला गेलं नव्हतं अशी भाषा त्यांच्याकडून देखील वापरल्या जाते. पीक कर्जासाठी कागदपत्र दिल्यानंतर त्याच्या मंजुरीला किती दिवस लागतील याची माहिती तर कधी मिळतच नाही कारण दोन-दोन तास बँकेच्या दारात उभे राहून अपमान करून घ्यायला बँकेत जायला कोण रिकामा आहे? एकंदरीतच शेतकऱ्यांची अवस्था चूई ला गुंतलेल्या कोल्ह्यासारखी झाली आहे. जिल्ह्यात कोरोणा रुग्ण सापडतच आहे अशा अवस्थेत शेतकऱ्याला जीव धोक्यात घालून बँकेच्या दारात उभे राहावे लागत आहे. या बँकेतून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे की नाही? शेतकऱ्यांची होत असलेली हेटाळणी थांबणार आहे की नाही? बँकेत सोशल डिस्टंसिंग चे पालन कधी होणार?, असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close