आपला जिल्हा

भूम तालुक्यातील गिरवलीच्या युवकाचा कोरोनाने अंबाजोगाईच्या स्वारातीत मृत्यू

अंबाजोगाईउस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली येथील 28 वर्षीय तरुण कोरोना बाधीत असल्याचे उघडकीस आल्यानंतर चौथ्या दिवशी त्याचा उपचारादरम्यान स्वराती रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पीडित मृतांचा सहा वर जाऊन पोहोचला आहे.

भूम तालुक्यातील गिरवली येथील 28 वर्षीय तरुण अंबाजोगाई येथील आनंद नगर मध्ये राहणाऱ्या आपल्या भावाकडे आला होता. त्याला अचानक सर्दी ताप येऊ लागल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला मात्र डॉक्टरांना संशय आला त्यामुळे त्यांनी त्याला स्वाराती रुग्णालयात जाण्यास सांगितले. याठिकाणी त्याची 26 जुलै रोजी कोरोना तपासणी करण्यात आली यात तो कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी त्याचा मृत्यू झाला.
सांगवी पाटण येथे मुंबईहून आलेल्या महिलेचा बीडमध्ये कोरोनाने पहिला बळी गेला. मातावळी येथील 35 वर्षीय व्यक्ती, माळेगाव येथील महिला, परळी येथील महिला, गहुखेल येथील पंधरा वर्षाचा मुलाचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूमुळे मृतांची संख्या आता सहा वर जाऊन पोहोचली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close