क्रीडा व मनोरंजन

बीड चा सचिन धस महाराष्ट्र संघाचा कर्णधार

बीड — 19 वर्षाखालील गटाच्या कुछ बिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सचिन धस कडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्राचा एलीट ब गटात समावेश असून यात महाराष्ट्रसह सौराष्ट्र पोंडीचेरी हैदराबाद आसाम व सिक्कीम या संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना राजकोट येथे सौराष्ट्र संघाविरुद्ध पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान खेळविला जाणार आहे. दुसरा सामना 12 ते 15 दरम्यान पॉंडिचेरी संघाबरोबर पोंडीचेरी येथे तिसरा सामना हैदराबाद बरोबर 19 ते 22 दरम्यान पुण्यात गहुंजे येथील एमसीएच्या मैदानावर पोहोचवता सामना आसाम संघाबरोबर 26 ते 29 दरम्यान नागोठणे येथील रिलायन्स मैदानावर तर अखेरचा व पाचवा साखळी सामना सिक्कीम संघाबरोबर तीन ते सहा डिसेंबर दरम्यान सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे.
बीड साठी सचिन धसची महाराष्ट्र च्या कर्णधार पदी निवड ही फार सुखद बातमी च्या रुपात आली आहे. बीडकरांच्या च्या आशा सचिन च्या खेळा मुळे खूप वाढल्या आहेत. सचिन च्या यशाची गती पाहून बीड कारणां विश्वास आहे सचिन लवकरच भारतीय संघात स्थान पटकावेल.
या प्रसंगी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर, सचिव मा. आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, अतीक कुरेशी, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख यांच्या वतीने सचिन चा कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button