आपला जिल्हा

कानोबाची वाडी येथील नविन नाली पहिल्या पावसात वाहून गेली – अँड. अजित देशमुख यांनी केली पाहणी

वडवणी —  तालुक्यातील कानोबाची वाडी हे गाव देवळा आणि खडकी जवळ आहे. या गावात पुला नजीक बांधलेली नाली पहिल्या पावसात वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता देखील काही ठिकाणी राहिला नाही. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी आणि नव्याने काम करावे अन्यथा वाडीतील लोकांना बरोबर घेऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

कानोबाची वाडी येथे दोन लहान पुलांचे काम चालू आहे. या पुलांना लागून असलेली नाली ही शेतकऱ्यांच्या बांधाला लागून आहे. नालीचे काम निकृष्ट झाल्याने नालीचा खालचा भाग पहिल्या पावसाच्या तडाख्याने वाहून गेला आहे. भिंत देखील काही ठिकाणी ढिली झाली आहे. त्यामुळे या भिंतीला देखील धोका निर्माण झाला आहे.
नाली पडली तर शेतकऱ्यांची जमीन वाहून जाणार आहे. काही ठिकाणी अजिबात रस्ता राहिला नाही. एका ठिकाणी प्रचंड पाणी साठलेले आहे, तर दुसर्‍या बाजूला मोठी नाली बांधलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जायला रस्ताही नाही.

अगोदरच पाऊस पडला की, बांधावरून शेतकऱ्यांची भांडण होतात. त्यातच या कामामुळे ज्या शेतकऱ्यांसाठी हा रस्ता होता, पाणी आणि नालीने रस्ता अडवला गेल्याने वादाची नवीन कारण समोर येत आहेत. हे काम तात्काळ करावे अन्यथा कान्होबाची वाडी येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलन केले जाईल. याची जबाबदारी काम करणारे गुत्तेदार, अधिकारी आणि यंत्रणेची राहील. रस्ता, नाली, पूल असे सारे काम निकृष्ट झाले असल्याचे आपण पाहिले असल्याचेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close