आपला जिल्हा

माजलगाव नगरपालिकेची धुरा उपनगराध्यक्ष यांच्या खांद्यावर

नगराध्यक्षपद रिक्त झाल्याची जिल्हाधिकार्‍यांची घोषणा

बीड भ्रष्टाचाराच्या आरोपात चार महिन्यापासून तुरुंगाची हवा खात असलेले माजलगाव चे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचे पद रिक्त झाल्याची घोषणा बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. सहाल चाऊस हे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या रिक्त जागी काम करण्याची संधी उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांच्याकडे जाणार आहे.

माजलगाव नगरपालिकेत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे माजलगाव शहरातील विकास काम ठप्प झाली होती. त्यामुळे
त्यांच्याविरोधात माजलगाव नगर पालिकेतील नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. दरम्यान नगराध्यक्ष सलग ३ महिने गैरहजर असल्याची याचिका  जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती.सहाल चाऊस तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पासून जेल मध्ये असल्यामुळे नगरपालिकेचा कारभार पाहू शकले नाहीत असं मूख्याधिकार्‍यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कायद्यातील तरतुदीनुसार नगराध्यक्ष तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून गैरहजर असल्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाले असल्याची घोषणा केली. सहाल चाऊस हे भाजपचे असल्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील त्यांच्याविरोधात मोहीम उघडली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close