कृषी व व्यापार

केंद्र सरकारने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढली; भाव वाढण्याची शक्यता

पुणे — सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढलेले असताना सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. मात्र आता केंद्र सरकारने खाद्यतेल व तेलबिया वरील स्टॉक लिमिट काढल्यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज जाणकार व्यक्त करू लागले आहेत.
सरकारने स्टाॅक लिमिट काढल्याने सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो.सरकारच्या निर्णयानंतर सोयाबनच्या दरात काहीशी सुधारणा झाली. सोयाबीनचा सरासरी दर आता 4 हजार 950 रुपयांवर पोचला आहे. तर बऱ्याच बाजारांमध्ये सोयाबीनचे दर 5 हजार 100 रुपयांपर्यंत पोचले होते. बाजारात सध्या सोयाबीनची आवक जास्त असली तरी दर किमान 5 हजारांपर्यंत असू शकतात तर पुढील काही दिवस दरपातळी 5 हजार ते 6 हजार रुपयांच्या दरम्यान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली. त्यामुळं दर दबावात आहेत. आता सरकारनं स्टाॅक लिमिट काढल्यानं सोयाबीन बाजाराला फायदा होऊ शकतो. व्यापारी आणि स्टाॅकिस्ट सोयाबीनची जास्त खरेदी करू शकतात.
– सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार अभ्यासक

स्टाॅक लिमिट काढल्याने स्टाॅकिस्ट बाजारात उतरतील. त्यामुळे दराला आधार मिळेल. मात्र खाद्यतेलाची आयातही वाढण्याचा धोका आहे. मात्र शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी ५ ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल.

– राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button