आपला जिल्हादेश विदेश

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबईपाकिस्तान मधून मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आल्यामुळे ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. याबरोबरच ताज हॉटेल समुद्र किनाऱ्याला लागून असल्यामुळे सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय ने दिले आहे.


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील कराची येथून ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. फोन आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवण्यासोबतच तपासही सुरु केला आहे. फोन आला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत.
ताज हॉटेल मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असून इथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. पण लॉकडाउनमुळे सध्या येथील परिसरात शांतता आहे. २६/११ हल्ल्यात दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले होते. यामुळे ताज हॉटेलबाहेर नेहमीच पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. या धमकीच्या फोनमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close