आपला जिल्हा

बालविवाहाची सुरु असलेली बोलणी पोलिसांनी थांबवली

परळीअल्पवयीन मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे पोहोचलेल्या पोलिसांना हा विवाह रद्द करण्यात परळी पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील बरकत नगर भागात एका मुलीचा विवाह होणार असल्याचे तसेच ही मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली नसल्याची माहिती पोलिसांना भेटली होती.संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी तातडीने या भागात जाऊन संबंधितांची चौकशी केली.
या चौकशी मध्ये हा विवाह होणार नसल्याचे सांगण्यात आले.केवळ विवाहाची बोलणीच झाली असल्याचे दोन्ही बाजूकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन्ही बाजूकडील लोकांना समज दिली,तसेच त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले. बालविवाहाची माहिती कळताच संभाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आरती जाधव यांनी तत्परतेने ही कारवाई केल्याने होणारा बालविवाह स्थगित झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close