आपला जिल्हा

हैऽ ऽ ऽ ऽ दत्तनगर मधील लोकांना कसं घाबरवलं? प्रशासनाच पसरवतय अफवा, पोरखेळ सुरूच

बीडआज बीड शहरात सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये एक रुग्ण दत्तनगर समोरील गल्लीतील असल्याची माहिती प्रशासनाने पत्रकारांना दिली. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र वरिल अहवाला मध्ये दत्त नगर ऐवजी दत्त मंदिर समोरील गल्ली असे वाचावे ही विनंती. अशी त्रोटक माहिती माध्यमांना देऊन जबाबदारी झटकली. प्रशासनाचा सुरु असलेला हा पोरखेळ मात्र जनतेला त्रासदायक ठरू लागला आहे. अधिकारिच आता अफवा पसरवू लागले आहेत.

अधिकारी जबाबदारीने कधी वागणार आहेत असा प्रश्न मात्र जनतेला पडला आहे.

बीड जिल्ह्याचा कोरोणाचा धोका आणखी टळलेला नाही. याची जाणीव असणारा वर्ग नियमांचे पालन करत जबाबदारीने वागतो आहे. अफवा पसरल्या जाऊ नयेत यासाठी तो सजग आहे. अफवा पसरवणारांवर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत आहे. असं असताना प्रशासनच माध्यमांना चुकीची माहिती देत अफवा पसरवण्याचे काम करत आहे. माध्यम देखील ही अधिकृत माहिती आहे आहे यावर विश्वास ठेवून जनतेला माहिती पुरवण्याचं काम चोखपणे करत आहे. प्रशासनाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे माध्यमांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. आज बीड शहर सापडलेल्या रुग्णांमधील एक रुग्ण दत्तनगर मधील नसून तो दत्त मंदिर गल्लीच्या शेजारी असलेल्या चून गल्लीतील आहे. मात्र प्रशासनाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे दत्तनगर परिसरातील जनतेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा मानसिक त्रास या भागातील रूग्ण तसेच वयोवृद्ध लोकांना जास्त झाला. प्रशासन आतातरी जबाबदारीने वागणार आहे काय ? अशा अफवा पसरवण्यास कारणीभूत ठरलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close