क्राईम

आईच्या डोळ्यादेखत मुलानं व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी

अंबाजोगाई — आई पाठीमागून ओरडत असताना तिच्या डोळ्यात देखत वीस वर्षीय मुलाने खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.ही घटना मुकुंदराज परिसरात वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवर घडली

दिनेश नरेश लोमटे रा. कोष्टी गल्ली, अंबाजोगाई असे या मृत युवकाचे नाव आहे.
दिनेश चे वडील नरेश ज्ञानोबा लोमटे हे पंधरा वर्षापासुन मनोरुग्नतेमुळे आजारी होते. आजारपणातच त्यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले होते. वडीलांचे निधन झाल्यानंतर बहिणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वडीलांच्या निधनामुळे दिनेशने देखील हाताची नस कापुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
आज सकाळी तो घरातून पळत सुटला. त्याच्या पाठीमागे आई देखील त्याला हाका मारत पळत होती. हे पाहून सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्रकारांनी त्याला अडवून समजवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना हुलकावणी देत मुकुंदराज परीसरातील व्ह्यू पाँईटवरुन त्‍याने खोल दरीत उडी घेत आपले जीवन संपवले.आईच्या आरडा ओरडीमुळे नागरीक जमा झाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button