क्राईम

बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत भावाची गळफास लावून आत्महत्या

केज — गेल्या तीन वर्षापासून सततची नापिकी होत असल्याने बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत वीस वर्षीय युवकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देवगाव येथे रविवारी घडली.

दीपक बालासाहेब मुंडे असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील देवगाव येथील बालासाहेब मुंडे यांच्यावर शेतीसाठीचे बँकेचे कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेले खाजगी कर्ज होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. यातून बाळासाहेब शिंदे यांचा २० वर्षीय मुलगा दीपक चिंतेत असे. कर्ज कसे फेडणार या विवंचनेत दिपकने रविवार दि 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यृची नोंद करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button