नेकनूर : 35 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

बीड — कंटेनर मधून गोवंशाची कत्तली साठी वाहतूक होत असल्याची माहिती नेकनूर चे प्रभारी ठाणे प्रमुख विलास हजारे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून 35 बैलांची सुटका केली या कारवाईत 34 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौवंशाची कत्तलीसाठी पर राज्यात तस्करी होणार असल्याची माहिती नेकनूर चे प्रभारी सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांनी नेकनूर ते केज रोडवर येळंबघाट जवळील उड्डाणपुलावर सापळा रचला. यावेळी कंटेनर क्र.के.ए.51 ए.डी.9009 याला थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 35 जनावरं आढळून आली. क्षमतेपेक्षा जास्त जनावर या कंटेनरमध्ये भरली होती. पोलिसांनी बैलांची तात्काळ सुटका केली. या कारवाईत कंटेनरसह पोलिसांनी 34 लाख
10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात प्रभाकर एस.सुब्रमण्यम रा.तामिळनाडू के.मोहन सुंदरम कितुचामी रा.केरळ, एम.कोबल रा.तामिळनाडू, व्ही.मुर्ती रा.तामिळनाडू यांच्यासह आणखी चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक जाधव, अनवणे, ढाकणे, मारूती कांबळे यांनी केली.