कृषीवार्ता

कृषी अधिकाऱ्यांनो तुमच्या मनासारखं घडतय, शेतकरी मरणाची वाट धरतोय, निकृष्ट बियाणांमुळे नांदुर घाट मध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीडराज्यात वेळेवर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करत पेरणी उरकून घेतली. मात्र बोगस बियाणांमुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामूळे संतप्त झालेल्या एका वृद्ध शेतकऱ्याने कृषी दुकानासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला. ही घटना नांदुर घाट मध्ये घडली आहे.

बीड जिल्ह्यात या हंगामात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. लालासाहेब दादाराव तांदळे हे उस्मानाबाद मधील वाशी तालुक्यातील फक्राबाद येथील रहिवासी असून त्यांची बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात जमीन आहे. त्यांनी आठ दहा दिवसापूर्वी नांदूर घाट येथील श्रेनिक कृषी सेवा केंद्रातून खत व बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली. मात्र नंतरही बियाणे उगवले नाही. यासंदर्भात त्यांनी दुकानदाराकडे तक्रार केली व बियाणे दुसरे देण्याची मागणी केली. मात्र दुकानदारांने या शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही अपमानास्पद वागणूक देत त्याला दमदाटी केली. अशा स्थितीत दुबार पेरणी कशी करावी या विवंचनेत असलेल्या या शेतकऱ्यांने कृषी दुकानासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी पोलीस चौकीकडे धाव घेत बियाणे कंपनी व कृषी दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान नांदुर घाट परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत ‌

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close