देश विदेश

दिल्लीकर टोळधाडीने परेशान, डीजे ढोल-ताशांचा घेतला जातोय आधार

नवी दिल्लीकोरोना संकटा बरोबरच आता  राजधानी दिल्लीवर टोळधाडीने हल्लाबोल केला आहे. गुरुग्राममधून टोळधाड दिल्लीत दाखल झाली आहे. टोळधाडीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आपत्कालीन बैठक बोलवली होती. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी आपत्कालीन बैठकीत ही माहिती दिली. या बैठकीत विकास सचिव, विभागीय आयुक्त , कृषी संचालक आणि जिल्हाधिकारी अपस्थित होते. 

दिल्लीच्या सीमेतील जसोला घाटात टोळधाडीची एक छोटी तुकडी घुसली आहे. वन विभागाला ढोल आणि डीजे वाजवण्यासह औषध फरवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम जिल्ह्यांच्या विभागीय आयुक्तांच्या माध्यमांतून निर्देश देण्यात आले आहेत. या जिल्ह्यांना हाय अलर्ट करण्यात आलं आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली. गुरुग्राममध्ये शनिवारी टोळधाडीने हल्ला केल्यानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
डोळधाडीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. दिल्ली सरकारच्या प्रशासनाने टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान हरयाणा, राजस्थान, पंजाब, यूपी, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने या शेतकरी आणि राज्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलीय.

हरयाणात हाय अलर्ट 

गुरुग्राम आणि रेवाडीमध्ये टोळधाडीमुळे हरयाणा सरकारने प्रशासनाला हाय अलर्ट जारी केला आहे. ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करणाऱ्या मशीनसह आवश्यक उपाययोजना कराव्यात. राजस्थानमध्ये दाखल झालेली ही टोळधाड महेंद्रगड जिल्ह्यातून शुक्रवारी संध्याखील रेवाडी जिल्ह्यातील जतुसाना आणि खोल प्रखंडातील विविध गावांमध्ये हल्ला केला. दरम्यान, राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी मोहीम सुरू उघडण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलीय. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close