आपला जिल्हा

गहिनीनाथगडाला हेलिकॉप्टरची परवानगी प्रकरण, उच्च न्यायालयात मंगळवारी होणार न्याय — माजी आ.भीमराव धोंडे 

आष्टी / दादासाहेब बन

श्री क्षेञ गहीनाथगड येथून नाथ पंथांचे आग्रणी गहिनीनाथांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवलीआहे.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथगडाच्या ” पादुका ” पंढरपूरला हेलिकॉप्टर नेण्यासाठी आवश्यक असणारी शासकीय परवानगी शासनाने नाकारली आहे.या अन्यायाविरुद्ध गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज गहिनाथगडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवार दि.३० जून रोजी निर्णय होणार असल्याची माहिती माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मुळ अधिष्ठान गहिनाथगड आहे.याच गहिनीनाथगडावरून वारकरी संप्रदायाची परंपरा सुरु झाली आहे. येथील भाविकांची दिंडी मोठ्या प्रमाणावर भक्तांची असते.महाराष्ट्रातून सात ठिकाणच्या पादुका हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी मिळाली आहे परंतु आठव्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्याचा हेतू शुद्ध नाही त्यामुळे या अन्यायाविरुद्ध महंत विठ्ठल महाराज यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल केली त्यावर २३ जुन रोजी उच्च न्यायालयाने पंढरपुर आषाढी यात्रा आयोजन समितीचे सचिव विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दिला असताना या समितीने परवानगी नाकारली आहे.त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला न्याय मिळेल अशी आशा असल्याचे मत माजी आ.भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करावे

यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकरी आनंदात आहे.लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.सोयाबीन बियाणे उगवलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल कदाचित या जमिनीवर शेतकऱ्यांना रब्बी पीक घेता येणार नाही त्यामुळे सोयाबीन बियाणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे. पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे.शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन आदेश देण्याची मागणी केली होती त्यावर जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन आदेश दिले आहेत परंतु बँक अधिकारी शेतकर्‍यांची अडवणूक करत असल्याचे दिसत आहे. बँक अधिकाऱ्यांनी आर्थिक अडचणीत फसलेल्या शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवून सर्व गरजू शेतकऱ्यांना विनाविलंब कर्ज वाटप करण्याचीही मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी यावेळी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close