ताज्या घडामोडी

नागरिकांना होणारा त्रास असह्य झाल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी केली नगर रोडवरील रस्ते बुजविण्यास सुरूवात

राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्ताकामासही प्रत्यक्षात सुरूवात

बीड — बीड शहरासह जिल्हाभराच्या दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम तांत्रिक बाबींमध्ये अडकल्याने व न्यायालयात प्रकरण चालू असल्याने अडकले आहे. काम सुरू करण्यास उशीर होत आहे. तसेच दिवसेंदिवस रस्त्याची अवस्थाही बिघडत चालली आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांना होणारा असह्य त्रास कमी करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच शहरातील वाहतूकीच्या अनुषंगाने मुख्य असलेल्या बायपास टू बायपास रस्त्यातंर्गत असलेल्या राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर पर्यंतच्या रस्ताकामालाही प्रत्यक्षात सुरूवात केली.


जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांचे मुख्यालये असलेल्या नगर रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु या रस्ताकामाचे प्रकरण तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रिया न्यायालयात गेल्याने काम सुरू होण्यास उशीर होत आहे. यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ निर्णय घेऊन शुक्रवार (दि.२८) रोजी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.

यानंतर लवकरच नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यासाठीही प्रयत्न करणार असून लवकरात लवकर नवीन रस्ता तयार होणार असल्याचेही आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे. तसेच शहरातील मुख्य वाहतूकीचा बायपास टू बायपास रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर पर्यंतचा एकूण ८०० मीटर अंतराच्या टप्प्याचे कामही बाकी राहीले होते. याही कामास शुक्रवार (दि.२८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रत्यक्षात सुरूवात केली. सदरील दोन्ही महत्वाची असलेली रस्त्याची कामे एकाच दिवशी सुरू झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button