आपला जिल्हा

बाबा रामदेव यांच्या सह चौघा विरोधात गुन्हा दाखल

जयपूरकोरोनिल औषधाच्या सेवनाने कोरोना आजार पूर्णपणे बरा होत असल्याचा दावा करणाऱ्या बाबा रामदेव पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण यांच्यासह चौघां विरोधात जयपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाबा रामदेव यांनी केलेला प्रचार पूर्ण दिशाभूल करणारा असल्याचा आरोप एफ आय आर मध्ये करण्यात आला आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाचे लाँचिंग केलं. ‘कोरोनिल’आणि ‘श्वासारी’या औषधामुळे रुग्ण पुर्णपणे बरा होतो. याचा प्रयोग १०० रुग्णांवर करण्यात आला. ३ दिवसात ६९ टक्के पॉझिटिव्ह रूग्ण निगेटिव्ह झाले, अशी माहिती योगगुरू रामदेव बाबा यांनी पत्रकारपरिषदेत दिली.  त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच कोरोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले.
जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close