देश विदेश

मोहीम फत्ते: चीनच्या टिक टॉक ला मित्रो अॅपने टक्कर देत केला रेकॉर्ड

चीनच्या टिकटाॅक अ‍ॅप विरोधात भारतीयांनी मोहीम उघडली आहे . सोशल मीडियाच्या माध्यमातून वस्तू तसेच ॲप’चा बहिष्कार करण्याचे आवाहन केले जात आहे.चीनी सोशल मीडिया कंटेट अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देण्यासाठी भारतात मित्रों अ‍ॅप लाँन्च करण्यात आले.याचाच भाग म्हणून अनेक भारतीयानी टिक-टाॅक अ‍ॅप फोनमधून डिलीट करत भारतीय मित्रों अ‍ॅप इस्टाॅल करण्यास सुरूवात केली आणि अवघ्या दोन महिन्यातच हे अ‍ॅप इतके प्रसिद्ध झाले की आतापर्यंत तब्बल 1 करोड लोकांनी डाऊनलोडही केले.

आता या अ‍ॅपची प्ले-स्टोरवर 4.5 इतकी रेटिंग झाली आहे. जर रेटिंगबाबत बोलायचे झाल्यास
गुगल प्ले स्टोरवर टिक टॉकहून याला अधिक रेंटिंग आहे. मित्रों अ‍ॅप हे एकदम टिकटॉक प्रमाणेच आहे. याचे सारे फंक्शनही त्याच्यासारखेच आहेत. तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही हे स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून वापरू शकता. हे पूर्णपणे फ्री डाऊनलोड करू शकता.

या अ‍ॅपचे फाउंडर्स शिवांक अग्रवाल आणि अनीष खंडेलाल यांनी प्रसिध्दिपत्रक काढत एक करोड लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्याचे स्पष्ट केले. शिवांक अग्रवालने म्हटले आहे की, मित्रों हे अ‍ॅप चांगलेच लोकप्रिय झाले असून टिक-टाॅकला चांगलीच टक्कर दिली आहे. पुढे ते म्हणाले की, आम्ही खूपच खूश
आहे आणि हे अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅप बाबत झाला होता वाद…

नुकताच या अ‍ॅप बदल मोठा गौप्यस्फोट झाला होता. मित्रों हे अ‍ॅप भारतीय आयआयटीच्या विद्यार्थ्यांने विकसित केलेले नाही. तर या अ‍ॅपचा सोर्स कोड त्या अ‍ॅपमधील फिचर, यूजर इंटरफेस हा जसाचे तसा एका पाकिस्तानी कंपनीकडून विकत घेण्यात आला आहे.मात्र, त्यांनतर मित्रों अ‍ॅपचा फाउंडर्स (संचालक)
शिवांक अग्रवाल आणि अनीष खंडेवाल यांनी या अ‍ॅपबदल विश्वसनीयतेचे
प्रमाणपत्र देत हे अ‍ॅप भारतीय असल्याचे सांगितले.
मित्रों अ‍ॅप लाॅन्चनंतर यामध्ये अनेक त्रूटी असल्याच्या यूजर्सने तक्रारी केल्या होत्या. यूजर्सने म्हटले होते की, यामध्ये अनेक त्रूटी आहेत त्यामुळे यामधून यूजर्सचा डेटा चोरी होऊ शकतो. यांनतर गूगलने काही दिवसाकरीता हे अ‍ॅप प्ले-स्टोरवरून हटवले होते. त्यांनतर मित्रों अ‍ॅपच्या फाउंडर्सने यांची दखल घेत यातील त्रूटी दुर केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे अ‍ॅप गूगल प्ले-स्टोरवर उपलब्ध असून इतके प्रसिद्ध झाले की अ‍ॅप  डाऊनलोडची संख्या ही 1 करोड झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close