शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच मोफत वह्या देखील मिळणार — शिक्षण मंत्री केसरकर

नाशिक — यापुढे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्या मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.
नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यापूर्वी तेथील विद्यार्थी अतिरिक्त शिक्षक या सर्व गोष्टींची माहिती घेऊनच बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितल. पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्यांचा खर्च करणे अवघड होते. त्यामुळे पुस्तकातच वह्यांची पान जोडता येतील का याबाबत तज्ञांची मतं जाणून घेण्यात येतील. पुस्तकांसोबतच वह्या देखील मोफत देण्यात येतील हा उपक्रम शिक्षण क्षेत्राला कराटणी देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर उपस्थित होत्या