खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना घरचा रस्ता दाखवणार — आयुक्त मुंढे

बीड — शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्यास सुरुवात केली आहे. आज बीडला आल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या सरकारी यंत्रणेतील डॉक्टरांना सज्जड दम देत यापुढे अस केल्यास नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असा इशारा दिला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन सर्व आढावा घेतला. आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना केल्या. सोबतच अधिकाऱ्यांची कान उघडणी देखील केली.उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही. तसेच यापुढे खाजगी प्रॅक्टिस एखाद्या डॉक्टरने केली तर त्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच झापले.31 ऑक्टोबर पर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश लातूरच्या उपसंचालकांना दिले आहेत.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साबळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते. तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना करत हलगर्जीपणा करणारांना चांगलेच धारेवर धरले. ऐन दिवाळीत तुकाराम मुंढे यांनी बीडला भेट दिल्यामुळे आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.