महाराष्ट्र

बोगस बियाणे: भुसे साहेब दादागिरी दाखवत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांच्या अन्नात माती कालवा

  • भुसे साहेब शेतकऱ्यांसाठी “नायक ” व्हा

  • इतिहासात झाली नाही अशी कारवाई करा

  • शेतकऱ्यांची ही अपेक्षा पूर्ण कराच

बीड — कोरोना लॉक डाऊन च्या काळात ज्या काळ्या आईने जगवले. त्याच आईची ओटी भरतांना मात्र हरामखोर निपजलेल्या औलादींनी (व्यापारी, बियाणे कंपन्या व कृषी अधिकाऱ्यांनी) शेतकऱ्यांना लुटण्याच्या नादात आपल्या आईशी गद्दारी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या बोगस बियाण्यांच्या गोरख धंद्यात हात धुऊन घेत असताना शेतकऱ्यांच्या अन्नात मात्र माती कालवत त्याचं कुटुंब देशोधडीला लावण्याचं महापाप केलं आहे. आशा हरामखोरांची चौकशी करून हेसुद्धा देशोधडीला लागले पाहिजे अशी कारवाई होण गरजेचं बनल आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या या लुटीतून निराशेने एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केलीच तर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दोषी विरोधात दाखल झाले तरच येणाऱ्या काळात असा देशद्रोह करण्याची हिम्मत कोणीच करणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागला आहे.

कोरोना संकटाच्या काळात एकशे तीस करोड जनतेला जगवण्याचा महत्त्वपूर्ण काम शेती व्यवसायन केलं. या संकटाच्या काळात आणखी काय परिस्थिती उद्भवेल हे सांगन अवघड आहे. अशा स्थितीत बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. लाॅक डाऊन च्या काळात देखीलइतर राज्यातून महाराष्ट्रात बियाणे आले त्यांची चढ्या भावाने व्यापाऱ्यांनी विक्री केली. निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाला असताना देखील त्यांनी या बियाणांची सर्रास विक्री होऊ दिली. निकृष्ट बियांनासोबतच भेसळ युक्त खतांचा पुरवठा देखील शेतकऱ्यांना केला गेला. हे सर्व होत असताना राज्याचा कृषी विभाग मात्र डोळे उघडे ठेवून बघत होता. या बियाणांमुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना बँक कर्ज द्यायला तयार नाहीत. पिक विम्याचा आधार नाही.
पाच-सहा वर्षाच्या कालावधीत भीषण दुष्काळी संकटाला शेतकरी सामोरा जात आहे. अशा अवस्थेत शेतकरी आत्महत्या कडे प्रवृत्त होत आहे. बीड जिल्हा तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. सरकारी आकडेवारीचा विचार केला तर एक दिवस आड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. संपूर्ण मराठवाड्यात यापेक्षा वेगळे चित्र नाही.अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांने मोठ्या विश्वासाने उत्पादन जास्त होईल या अपेक्षे पोटी कंपन्यांचे बियाणे खरेदी केले. पण ते वाफलेच नाही. कृषी विभागाकडे आता विनंती अर्ज केले जात असले तरी पंचनामा होताना दिसून येत नाही. पंचनामा होई पर्यंत थांबायला शेतकऱ्यांची वेळ नाही. तर पंचनामा करायला अधिकाऱ्यांना घाई नाही. जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे आले ते विक्री झाले शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली. शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली मात्र कृषी विभाग या स्थितीत झोपा काढत होता काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे हे अधिकारी काम करणार नसतील व जबाबदारी घ्यायला तयार नसतील तर यांचा उपयोग काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे. संकटकाळात ज्या काळ्या आईने या हरामखोरांना जगवले त्यांनीच घात करत तिला उध्वस्त करण्याचे काम केले. बियाणे कंपन्या व्यापारी , कृषी अधिकारी यांनी संगनमताने केलेले हे महापाप एक प्रकारचा देशद्रोहच आहे.किमान या संकटाच्या काळात तरी त्यांनी जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे होते मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून आले देशाला आणखी संकटात टाकण्याचं महापाप या लोकांनी केल असून झालेल्या प्रकाराची कसून चौकशी करत दोषी आढळणाऱ्या अधिकारी बियाणे कंपन्या व व्यापार्‍यांच्या अन्नात माती कालावण्याचं महत्पूण्य करावं. दुबार पेरणी च्या संकटातून न सावरलेला शेतकऱ्यांने आत्महत्या केलीच तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे यांच्यावर दाखल होणं गरजेचे असल्याचे संतप्त मत शेतकरी वर्गातून व्यक्त केलं जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close