बीड-नाळवंडी रस्त्यासाठी दहिफळ-चिंचोलीच्या महिला थाळी नाद मोर्चा आंदोलन करणार

बीड — बीड नाळवंडी रस्त्यासाठी वारंवार आंदोलन करूनही दखल न घेतल्यामुळे शेवटी दहिफळ चिंचोली येथील महिला आक्रमक झाल्या आहेत. 27 ऑक्टोबरला प्रशासनाचे कान उघडावेत यासाठी थाळी नाद मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
बीड ते नाळवंडी या रस्त्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने 2021 ऑगस्ट मध्ये 10 दिवस नाळवंडी नाका बीड येथे ठिय्या आंदोलन केले होते प्रशासनाच्या व स्थानिक नेत्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास पाठीमागे घेतले होते परंतु त्यावरती कसल्याही प्रकारचे काम झाले नाही म्हणून समस्त त्रस्त नागरिक या अत्यंत खराब रस्त्यासाठी मोर्चा व थाळी नाद आंदोलन करणार आहेत हा रस्ता खूपच खराब झाला असून या रस्त्याने पायी चालणे मुश्किल झाले आहे; तरीसुद्धा जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी हे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नाहीत! याचा निषेध म्हणून बीड-नाळवंडी रस्त्यासाठी दहिफळ, चिंचोली,नाळवंडी,लक्ष्मीआई
तांडा, व जुजगवान येथील महिलांनी आक्रमक झाल्या आहेत,म्हणून त्यांनी येत्या 27 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय थाळी नाद आंदोलन व मोर्चा ऐन दिवाळीच्या सणात जिल्हा अधिकारी कार्यालय बीड येथे बेलन घेऊन थाळी नाद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे; यापूर्वी आम आदमी पार्टी कडून निवेदनाच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला गेल्या कित्येक वर्षापासून बीड नाळवंडी रस्त्याच्या कामासाठी विनंती आलेली असून; त्याची कुठलीही दखल प्रशासनाने घेतलेली नाही ही बाब लक्षात घेऊन महिलांनी आक्रमक होऊन जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना झोपेतून जाग करण्यासाठी आणि त्यांचे लक्ष रस्त्याच्या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यासाठी व रस्त्याच्या कामाच्या लेखी आश्वासनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करणार आहेत यात चिंचोली येथील महिला इतर गावातील महिला बचत गट व महिला मंडळाच्या महिला आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे देण्यात आले त्यावेळी स्वाती मुळे, मनीषा राऊत, रंजना काळे, संगीता राऊत, शारदा काळे, रोहिणी बेद्रे, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, बाबासाहेब राऊत, नवज्योत बेद्रे, इत्यादी कार्यकर्ते व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते