आपला जिल्हा

बीड मध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मंजुरी, प्लाझमा बँक सुरू करण्यात येणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

        • आरोग्य विभागात 25 हजार पदे भरण्यात येणार

बीडलातूर औरंगाबाद आणि अंबाजोगाई प्रमाणेच बीड येथे देखील कोरोना तपासणीसाठी ची प्रयोगशाळा मंजूर करण्यात येत असल्याचे सांगत लवकरच आरोग्य विभागातील तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी संवर्गातील पंचवीस हजार पदांची मेगा भरती केली जाईल तसेच बीड जिल्ह्यातही प्लाझमा बँक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली

बीडचे पालकमंत्री श्री मुंडे यांच्या कठोर प्रयत्नांनी वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ झाल्याचे सांगताना वैद्यकीय शिक्षण मंत्री  देशमुख म्हणाले जिल्ह्यात कोरोनाविषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू होण्यासाठी पालकमंत्री श्री मुंडे यांचे भूमिका महत्त्वाची होती असे नमूद केले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, नगराध्यक्ष रचना मोदी, अधिष्ठाता डॉ सुधिर देशमुख आदी उपस्थित होते

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख म्हणाले , कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत सुरुवातीला राज्यात फक्त दोनच व्हीआरडीएल प्रयोगशाळा होत्या तेथे फारच मर्यादित नमुने तपासणी करणे शक्य होते परंतु या कालावधीत त्यांच्यात वाढ करून राज्यातील प्रयोगशाळांमध्ये आता 50000 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील व्हीआरडीएल प्रयोगशाळा उभारणीस तत्वतः मंजुरी, एमआरआय मशीन ला मंजुरी देण्यात आली आहे,असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे यामुळे महाराष्ट्रात जगातील सर्वात विस्तारित असे प्लाझमा थेरपी सेंटर उभारण्यात येत असून त्याचे लवकरच उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होईल त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही प्लाझमा बँक सुरू करण्यात येईल.
नागरिकांना तत्पर आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देतानाच आयुर्वेद युनानी आधी वैद्यकीय उपचारांना देखील चालना देण्यात येईल वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य विभागात पंचवीस हजार पदे भरण्यात येणार आहे असे ते म्हणाले अं बाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयासाठी 750 नवीन बेड मंजूर करण्यात आले असून इतर मागण्यांना तत्वाचा मंजुरी देण्यात आल्याचेही याप्रसंगी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close