माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ठाकरेंच्या शिवसेनेतून बेदखल

बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही अशी घोषणा अनिल दादा जगताप जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील यांनी आज शनिवारी बीडमध्ये , घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या विविध रस्ता कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला बीडमधील पदाधिकाऱ्यांना तर सोडाच परंतू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे क्षीरसागर नेमके कोणाचे? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.बीड शहरामधील हॉटेल गोल्डन चॉईस येथे आज शनिवार दि. 22 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी अनिल दादा जगताप व धोंडू पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना सन्मान दिला. मंत्रिपद दिले, विधानसभा उमेदवारी दिली. मात्र पक्ष , कार्यक्रमास ते नेहमीच गैरहजर राहत होते. त्यामुळे त्यांचा यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही.आता यापुढे आम्ही स्वतंत्र निवडणूका लढणार नाही, अशी भूमिका संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले.यावेळी जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव,माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, बाप्पासाहेब घुगे, दिलीप गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.