परळी: महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत आग; कागदपत्रासह साहित्य जळाले

परळी – शहरातील सुभाष चौकात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये बँकेतील महत्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुट्टी असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याची माहिती खाली असलेल्या दुकानाचे मालक चव्हाण यांनी अग्निशामक दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच औष्णिक विद्युत केंद्र व नगरपालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र
या भीषण आगीत बँकेतील जवळपास सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून खाक झाली आहे. या आगीमुळे स्ट्रॉंग रूमचे नुकसान झाले नाही.सुट्टीच्या दिवशी आग लागल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.