आरोग्य व शिक्षण

बीडच्या बामणवाडी भागातील महिला औरंगाबाद मध्ये आढळली कोरोना बाधित; बीडचे एक रुग्णालय केले बंद

बीडऔरंगाबाद येथे उपचार घेत असलेली बामणवाडी भागातील महिला कोरोना बाधित निघाल्यानंतर तिच्यावर उपचार केल्या गेलेल्या बीड शिव कमल हॉस्पिटल ला 24 तासासाठी बंद करण्यात आले असून या चार दिवसात कोणी कोणी उपचार घेतले याची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. याबरोबरच हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना कोरंटाईन करण्यात आले आहे.
बीड शहरात असलेल्या बामणवाडी येथील महिलेला न्यूमोनिया झाल्यामुळे 22 जून रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला होता. या महिलेला बीडच्या शिवकमल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन-तीन तासाच्या उपचारानंतर तिला हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबाद येथे घेऊन जाण्यात आले. मात्र याठिकाणी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच शिवकमल हॉस्पिटल बंद करण्यात आले असून ते संपूर्ण सॅनिटाईज करण्यात येणार आहे. याबरोबरच ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या महिलेच्या संपर्कातील लोकांची व कुटुंबातील लोकांची माहिती गोळा करण्यात येत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close