क्राईम

खडकी मध्ये दहा एम.एम. गज वापरून बनवला जातोय पूल ; जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली–अँड. अजित देशमुख

बीडवडवणी तालुक्यातील खडकी कडे जाणार्‍या रस्त्या वर पुलाचे काम चालू आहे. पुलासाठी दहा एम.एम. जाडीचे गज वापरले जात आहेत. याबाबत जन आंदोलनाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही बाब जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना कळविण्यात आली. त्यांनी या बांधकामाकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करुन दर्जेदार पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जनआंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

दहा-बारा गावांना जोडणारा हा पूल दहा एम.एम. जाडीच्या गजाने बांधला जात असून वापरल्या जाणाऱ्या गजाचे प्रमाण देखील खूप कमी आहे. अशा प्रकारची तक्रार जन आंदोलनाला प्राप्त झाली. ही बाब जनतेसाठी धोक्याची ठरू शकते आणि कोसळणार्‍या पुलामुळे जनतेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जो कोणी दोषी आहे, त्याचेवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये या पुलावर नियंत्रण ठेवणाऱ्या दोषी अभियंत्याचा देखील गुन्हेगार म्हणून समावेश असावा, अशीही अपेक्षा आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी यात तात्काळ लक्ष घातले आहे. त्यामुळे कमी जाडीचे गज वापरण्यात आले असतील तर आता पूल पाडून पुन्हा उभा करणे आवश्यक आहे. या पुलाकडे जन आंदोलनाचे लक्ष असून जर चुकीचे बांधकाम चालू ठेवले तर संबंधित अभियंता विरोधात आणि संबंधित गुत्तेदार विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close