आपला जिल्हा

बीडला आजही दिलासाच; पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण भूम तालुक्यातील गिरवलीचा

बीडकोरोना बाधित रुग्ण सापडण्याची मालिका तीन दिवस खंडित झाली होती. मात्र शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या 19 संशयितांच्या स्वॅब पैकी 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एक संशयित पॉझिटिव आढळला असला तरी तो रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली येथील आहे.
जिल्ह्यातून 19 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय 5, अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण महाविद्यालय 10,आष्टी ग्रामीण रुग्णालय1,माजलगाव ग्रामीण रुग्णालय-2 आणि केज उपजिल्हा रुग्णालयात 1 स्वॅबचा  समावेश होता. यातील स्वाराती रुग्णालयातील 10 पैकी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा 28 वर्षीय पुरुष रुग्ण गिरवली (ता.भूम, जि.उस्मानाबाद) येथील राहिवाशी आहे. तर उर्वरित 18 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज बीड जिल्ह्यात 5 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.आजपर्यंत जिल्ह्यात 116 बाधीत रुग्ण सापडले, यातील 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तब्बल 91 जण बरे झाले असून जिल्ह्यात आता 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close