क्राईम

शिरुर : पुरात दोन बहिणींसह तरुणाचा वाहून गेल्याने तर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शिरूर — तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने रोंद नदीला आलेल्या पुरात दोन बहिणीसह एका तरुणाचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झाल्या ची घटना घडली तर एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले असून तरुणाचा शोध सुरू आहे.

शिरूर तालुक्यातील रायमोह जवळ असलेल्या भानकवाडी येथे दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे रौंद नदीला पूर आला. शेतात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी स्वरा कुंडलिक सोनसळे वय 12 वर्ष तसेच छकुली कुंडलिक सोनसळे वय 9 वर्ष या पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहताच त्यांच्याकडे आलेला नातेवाईक तरुण साईनाथ भोसले रा. शिरसमार्ग वय 30 वर्ष याने दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न निष्कळ ठरला व तो देखील वाहून गेला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसिलदार श्रीराम बेंडे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पवार दाखल झाले. या तिघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ ची मदत घेण्यात आली. शोध कार्य सुरू केल्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले मात्र तरुणाच्या मृतदेहाचा अद्याप शोध सुरू आहे. याबरोबरच भानकवाडी जवळच असलेल्या दगडवाडी शिवारात शेतात काम करत असलेल्या रावसाहेब जायभाये या 55 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button