क्राईम

सततच्या छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या

परळीयेथील जगतकर गल्लीतील रा २४ वर्षीय तरुणीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्या तरुणाविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगतकर गल्लीत राहणारी निकीता सखाराम जगतकर (वय२४) ही तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कॉलेजला जात येत असताना तरुण उस्मान लतीफ शेख हा तिला सतत त्रास देत होता.
तसेच मोबाईल नंबर मिळवून फोनवरही सतत भेटण्याची विनंती करत होता. हा होणारा त्रास तरुणीने वडीलांना सांगितला. वडीलांनी त्याचा फोन घेऊ नको असा सल्ला दिला. वडील आपल्या नातेवाईकांना घेऊन उस्मान शेखच्या घरी त्याला समजावून सांगण्यासाठी जाणार होते.पण या तरूणीने आई वडील बाहेर गावी गेल्यानंतर १२ जूनला आत्महत्या केली. दुपारी आई, वडील आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या मुलीच्या वडीलांनी उस्मान शेख मुळेच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून २४ जूनला संभाजीनगर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close