कृषीवार्ता

गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस घराची भिंत पडून महिला जखमी

गेवराईशहर व परिसरात गुरुवार ता. 25 रोजी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. भयान वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली असून, झाडे उन्मळून पडली आहेत. वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. झालेल्या पावसाने नदी, नाले तुडूंब भरून वाहिल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. दरम्यान, घरावरचे पत्रे व भिंत पडल्याने वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुंढे यांनी महिलेवर उपचार केले आहेत.

और

 आठ दिवसांपासून पाऊस नव्हता, त्यामुळे काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. दोन दिवसा पासुन उकाडा जाणवत होता. शहर व परिसरातील विविध भागात गुरूवारी ता. 25 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोराचे वादळी वारे वाहू लागल्याने बाजारपेठेतील दुकानाच्या पाट्या, पत्रे उडाली आहेत. महामार्गावरच्या रस्त्यावरची झाडे उन्मळून पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. साठे नगर, संजयनगर परीसरातील नागरीकांच्या घरावरील पत्रे उडून दूरवर पडली आहेत. काहींच्या भिंती पडल्या मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. तहसील व दर्गा परीसरातील झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत. तहसील परीसरात राहणार्‍याद्रौपदी तुकाराम उदावंत ( 70 ) रा. बोर्डे गल्ली या वयोवृद्ध महिलेच्या अंगावर भिंत पडल्याने जखमी झाली आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुंढे यांनी उपचार केले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close