देश विदेश

अच्छे दिन की हो रही है बौछार! इंधन दरवाढीने जनता बेजार

मुंबईपेट्रोलियम कंपन्यांनी ७ जूनपासून सुरु केलेली इंधन दरवाढ एकोणिसाव्या दिवशीही सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 14 व 15 पैशांनी वाढल्या आहेत. या 19 दिवसात पेट्रोल 8 रुपये 66 पैसे तर डिझेल 10 रुपये 39 पैशांनी वाढल्या आहेत. एकंदरीतच लाॅक डाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेला गरीब मध्यमवर्गीय महागाईमध्ये भरडला जात आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ४० डॉलरच्या आसपास आहेत. मात्र देशातील इंधन दर हे झपाट्याने वाढत आहेत. कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवले होते. आज गुरुवारी त्यामध्ये वाढ केली. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.७० रुपये झाला आहे. त्यात १६ पैशांची वाढ झाली. तर डिझेलचा भाव ७८.३४ रुपये झाला आहे. सलग १९ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. विशेष म्हणून डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे. 

दिल्लीत गुरुवारी पेट्रोलचा भाव ७९.९२ रुपये झाला. तर डिझेलमध्ये आज १४ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती ८० रुपयांवर गेल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ८०.०२ रुपये झाला. बुधवारी तो ७९.८८ रुपये होता. कोलकात्यात आज पेट्रोल ८१.६१ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.१८ रुपयांवर गेला आहे. त्यात १७ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७५.१८ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.२९ रुपयांचा स्तर गाठला आहे. करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close