देश विदेश

अहो आश्चर्यम् ! जन्मतःच तीळ्यांना निघाला कोरोना आई मात्र निगेटिव्ह

नवी दिल्ली — मेक्सिकोमध्ये कोरोना विषाणूचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे ट्रिपलेट्स म्हणजेच एकाच वेळी जन्माला आलेल्या तीन मुलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले, परंतु आश्चर्य म्हणजे या मुलांच्या पालकांना कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. या प्रकरणाने डॉक्टरांना आश्चर्यचकित केले आहे आणि तेथील आरोग्य अधिकारी यामागील कारण काय असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आरोग्य अधिकारी सांगतात की त्यांनी यापूर्वी अशा प्रकारची घटना कधीही पाहिली नव्हती किंवा ऐकली नव्हती. या तिन्ही मुलांपैकी एक मुलगी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या जन्माच्या चार तासानंतर त्यांची कोरोना विषाणूची चाचणी सॅन लुईस पोटोसी येथे घेण्यात आली, जेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना असा विचार आला की कदाचित मुलांची आई कोरोना विषाणूची एक लक्षण नसलेली रुग्ण असेल आणि त्यामुळे मुलांमध्ये विषाणूचा प्रसार झाला असेल. मुलांच्या अहवालानंतर पालकांची चाचणी घेण्यात आली पण दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला.

आरोग्य सचिव मोनिका रंगेल यांनी एका परिषदेदरम्यान सांगितले की, ‘मुलांच्या पालकांच्या कोरोना विषाणूची चाचणी निगेटिव्ह आली आणि आमचे पूर्ण लक्ष त्याकडे लागले आहे. आम्ही तज्ञांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे.’ या मुलांची देखरेख करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ’17 जून रोजी जन्मलेल्या तीन मुलांपैकी दोन पूर्णपणे तंदुरुस्त असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, तर तिसर्या मुलाला न्यूमोनिया झाला होता पण तोही आता ठीक आहे.

मोनिका रंगेल म्हणाल्या की, हे ट्रिपलेट्स सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच राहतील. दरम्यान मेक्सिकोमध्ये कोरोना विषाणूची 190,000 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत आणि त्यातून 23,377 लोक मरण पावले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close