ताज्या घडामोडी

जिल्हाप्रशासन व नप.ची दादागिरी हातगाडे,टपरीधारक गोरगरीबांवर; भुमाफियांच्या बाबतीत मुग गिळुन गप्पच

बीड — जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील नगररोड भागातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते नगरनाका परीसरातील रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले चहाच्या,पानाच्या टप-या,हातगाड्या वरील लहान हाॅटेल उद्ध्वस्त करत ऐन दिवाळीत हातावर पोट भरणा-या लहान व्यावसायिकांवर संक्रांत आणली. मात्र हेच जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन धनदांडग्या भुमाफियांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवत नसुन मुग गिळुन गप्पच आहे.

बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा,अनेक सरकारी कार्यालयांच्या ईमारती अतिक्रमणाच्या विळख्यात असून आरोग्य विभागाची मोक्याच्या जागेवरील जिल्हाप्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीची संरक्षक भिंत तोडून अतिक्रमणे झालेली असून एसटी महामंडळाची मोक्याची जागाही अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. सुभाष रोडवर अतिक्रमण करून व्यावसायिक पेठच उभारली असून रहदारीस अडथळा येत असून न्यायालयात प्रकरण असल्याचे दाखवून अतिक्रमित दुकानदार महिन्याकाठी २० हजाराचे भाडे दुकानदारांकडून वसुल करतात नविन भाजीमंडीत देखील तात्पुरत्या अतिक्रमणामुळे वाहतूक व रहदारीस अडथळा होत असून याठीकाणी कारवाईची गरज आहे.

शहरातील तसेच बिंदुसरा-करपरा नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी सत्याग्रह आंदोलन :- डाॅ.गणेश ढवळे
बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे,शहरात ठिकठिकाणी बेकायदा होडींग लागलेल्या असून त्यामुळे अनेकवेळा अपघात होतात तसेच बिंदुसरा-करपरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन वारंवार निवेदन देऊन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई करत नसुन संबधित प्रकरणात कारवाई करण्यात यावी यासाठी दि.२४ ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी बीड,मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि बीड जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती शेख युनुस च-हाटकर यांनी दिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button