सांगा मुख्यमंत्री साहेब मी मोठा झाल्यावर ऊसच तोडायचा का? –विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मांडली कैफियत

बीड — माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडावा लागेल? आमच्या पिढीने शिकायचं नाही का? असं थेट पत्र जायभाय वाडीच्या विद्यार्थ्यांन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.
. ज्या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे चौथीपर्यंत असलेली डोंगरात बसलेल्या जायभाय वाडीची शाळा देखील बंद होणार असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं. त्यामुळे या शाळेचा विद्यार्थी समाधान बाबासाहेब जायभाये याने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच पत्र लिहित आपल्या भावना मांडल्या. आम्ही ऊसतोड कामगारांची मूल असून इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचं विद्यार्थ्याने या पत्रात म्हटलंय. हे पत्र सध्या सोशल माध्यमात देखील व्हायरल झालंय माझं गाव जायभायवाडी डोंगर भागात असून इथं चौथीपर्यंत शिक्षण घेता येतं. गावातून इतर ठिकाणी जायचं म्हटलं तर पाच ते सात किलोमीटर चालत डोंगर चढ उतार करत जावं लागतं. पावसाळ्यात जाणे येण्या साठी मोठा अडथळा होतो. आई वडील सहा महिने ऊस तोडणीला जातात अशा परीस्थीती मध्ये आम्ही शिकायचं कसं? आमची पिढी शिक्षणा पासून वंचित ठेवायची का? मोठा झाल्यानंतर मी ही ऊस तोडायचा का?असा सवाल या विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे