राजकीय

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून शिंदे फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी?

मुंबई — वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे समर्थक आमदारांकडून मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी केलेल्या शिफारशींना उपमुख्यमंत्री केराची टोपली दाखवत असल्यान नाराजीचा सूर उमटू लागल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे.

राज्यात अलीकडे सनदीअधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या असल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या वेळी विविध विषयांसह पोलिसांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले त्यालाही आता शंभर दिवस उलटून गेले. मात्र बदल्यांचा विषय अजून मार्गी लागलेला नाही आहे. यावरून उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते स्वतः गृहमंत्री असल्याने त्यांच्याकडे
याबाबत वारंवार विचारणा होत आहे.निवडणूक प्रचार, शहरातील, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय पोलिसांच्या हातात असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावरुन शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये नाराजी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे. दरम्यान, शिंदे समर्थक आमदारांच्या बदल्यांच्या शिफारशींना फडणवीस जुमानत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापून
साताऱ्याला निघून गेल्याच वृत्त आहे.आमदारांनी सुचवलेले नावे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या यादीत तफावत असल्यामुळे वाद सुरु झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका व्यासपीठावर सुद्धा दिसत नाहीय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यां मध्ये नाराजी असल्याने त्यांनी रविवारी एकत्र येणे सुद्धा टाळले होते. रविवारी सकाळी राजभवन येथे स्टार्टअप यात्रांमधील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्याचा तर ठाण्यात श्रीमद् भागवत कथा ज्ञान महायज्ञाचा व सायंकाळी ठाण्यातच ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आयोजित भव्य सत्कार समारंभ असे मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे एकत्र तीन कार्यक्रम होते. मात्र या तिन्ही कार्यक्रमांपैकी एकाही कार्यक्रमाला हे दोघे एकमेकांसमोर आले नाहीत. बंजारा सेवा संघाच्या तिसऱ्या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली मात्र वेगवेगळी.त्याचबरोबर मुख्यमंत्री हे अनेकदा कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीत त्याबद्दल सुद्धा फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. हम साथ साथ है, म्हणणारे अल्पावधीतच दूर जातात की काय? अशी शंका विरोधक व्यक्त करू लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button