महाराष्ट्र

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या11आयपीएस अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्त

मुंबई — प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील 11 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना सोमवारी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने सोमवारी काढले आहेत. नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजलगावच्या उपविभागीय अधिकारी पदी धीरज कुमार बच्चू तर भोकरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी अफकत आमना यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि  नियुक्तीचे ठिकाण

1. तेजवीर सिंह संधू -2018 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी , मालेगाव शहर उपविभाग, नाशिक (ग्रामीण)

2. धीरज कुमार बच्चु 2019 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव उपविभाग, जिल्हा बीड

3. शफकत आमना – 2019 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर उप विभाग, जिल्हा नांदेड

4. अभयसिंह बाळासाहेब देशमुख – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग, जिल्हा जळगाव

5. गोकुळ राज जी- 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर उप विभाग, जिल्हा अकोला

6. आशित नामदेव कांबळे – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक उप विभाग, नागपूर (ग्रामीण)

7. महक स्वामी – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर उप विभाग, औरंगाबाद (ग्रामीण)

8. नितिपुडी रश्मिता राव – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर उप विभाग, जिल्हा भंडारा

9. पंकज अतुलकर – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद उप विभाग, जिल्हा यवतमाळ

10. सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे शहर उप विभाग, जिल्हा धुळे

11. एम.वि. सत्यसाई कार्तिक – 2020 बॅच उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा उप विभाग, पुणे (ग्रामीण)

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button