पिक गेली:बीड जिल्ह्यात आत्महत्यांच सत्र सुरू, शेतकरी महिलेची आत्महत्या

गेवराई — परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. यातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्यांच सत्र सुरू झाल आहे.आता महिला शेतकरी देखील आत्महत्या करीत असल्याच पाहायला मिळत आहे. वेचलेला कापूस भिजला आता वर्ष कसं घालवायचं या विचारात नंदपुर कांबी येथील महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील नंदपूर कांबी येथील शेतकरी महिला सविता बळीराम मुळे वय 42 वर्षे या महिलेचा पती अपंग आहे. दोन मुलांसह सविता स्वतः कष्ट करून घर चालवतात. शेती करतात. मात्र गेल्या आठवडा-भरापासून जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात असलेल्या कापसाची वेचणी रविवारी सविता मुळे यांनी केली दोन ते तीन वेळा पाऊस आला. त्या दरम्यान शेतातला कापूस तर भिजलाच, मात्र वेचलेला कापूसही भिजला. आता वर्ष कसं घालवायचं या चिंतेत आणि नैराश्येतून सविता मुळे या शेतकरी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी जावून पोलिसांनी पंचनामा केला.