आरोग्य व शिक्षण

प्रा. महारुद्र डोंगरे हैद्राबाद येथे नॅशनल बेस्ट टीचर अवार्ड ने सन्मानित. Prof. Awarded National Best Teacher Award at Maharudra Dongre Hyderabad

बीड जिल्हयाची देशात मान उंचावली.
बीड — कालिकादेवी कनिष्ठ महाविद्यालय शिरूर कासार येथील प्राध्यापक श्री महारूद्र डोंगरे यांना हैद्राबाद येथे अविष्कार सोसियल अॅंड इजुकेशनल फाउंडेशन ने 2022 -23 चा नॅशनल बेस्ट टीचर अवार्ड ने सन्मानित केले. त्यांच्या या सन्मानाने बीड जिल्हयाची देशात मान उंचावली.
16 अॉक्टोबर या जागतिक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कार समारंभाचे आयोजन हैद्राबाद येथील सुप्रसिध्द सालारजंग म्युझियमच्या सभागॄह करण्यात आले.
तेलंगणा राज्य सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश सन्माननीय चंद्रयाजी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त तेलंगणा राज्य सन्माननीय मधुकरजी स्वामी यांच्या हस्ते प्राध्यापक महारुद्र डोंगरे यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल हैद्राबाद येथे नॅशनल बेस्ट टिचर अवार्डने सन्मानित करण्यात आले.यावेळी तेलंगणा राज्याचे गृहमंत्री सन्माननीय मोहम्मदजी महेमुद अली यांनीही शुभेच्छा दिल्या.
या वेळी अविष्कार फाउंडेशनचे भारतीय अध्यक्ष संजयजी पवार ,संस्थेचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष श्री. गुडूरी शेड्रॅक , सेक्रेटरी सुंदरय्या या बुरगुला यांची उपस्थिती होती. सन्माननीय जस्टीस चंद्रयाजी यांनी प्राध्यापक महारुद्र डोंगरे यांचा सन्मान त्यांना खुर्चीवर बसवून केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक महारुद्र डोंगरे यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा लेखाजोखा मान्यवरांच्या समोर मांडला. मान्यवरांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विंजामारम नीरजा यांनी केले.
प्राध्यापक महारुद्र डोंगरे यांना हा देशपातळीवरचा नॅशनल बेस्ट टीचर अवॉर्ड पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणूनही ते काम पाहतात. त्यांच्याकडे राजकीय आणि प्रशासकीय ही जबाबदारी असतानाही त्यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक महारुद्र डोंगरे यांना शुभेच्छा दिल्या . संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. राजूजी मचाले सर , श्री. एम ए राऊत सर आणि श्री. व्हि. एल. क्षीरसागर सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आप्पासाहेब येवले वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री खंदारे सर तसेच माजी प्राचार्य श्री वसंत काटे प्राध्यापक संजय काकडे यांनी सुद्धा त्यांच्या कामाचे कौतुक करत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button