आपला जिल्हा

जामखेड मधील दरोड्यात बावीस तोळे सोने दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास

जामखेडयेथील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या दरोड्यात 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि दरोडेखोरांनी रात्री एक ते तीनच्या सुमारास घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात असलेले सर्व लोक झोपेत होते. चोरट्यांनी आवाज न होऊ देता घरात असलेला सोन्याचा 22 तोळ्याचा ऐवज व दोन लाख रुपये नकदी घेऊन पसार झाले. तात्याराम यांच्या आई पहाटे उठल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसून आला. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी घरातील सर्व सदस्यांना झोपेतून जागे केले. त्यावेळी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. याठिकाणी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. घटनेचा तपास पोलीस करत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close