आपला जिल्हा

शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना ;आ. पडळकरची जिभ घसरली

मुंबई –‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याची टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

आमदार गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला एक हजार कोटींची तरतूद केलेली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारने केलेली तरतूद दिलेली नाही. शरद पवार हे नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close