कृषी व व्यापार

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर शेतकऱ्यांच्या बांधावर;सडलेलं सोयाबीन,कापसाचे बोंड दाखवत शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या

बीड — गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे,त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाआहे,कपाशी,सोयाबीन,तूर भुईमूग,बाजरी,उडीद,मूग मटकी आदि पिके अक्षरशः पाण्यात सडून गेली आहेत,आज माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली,आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ भेटून निवेदन देणार असून लवकरात लवकर मदत निधी मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.

 

गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वेळ मतदार संघातील अनेक गावात आजही मुसळधार पाऊस सुरूच आहे आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घोडका राजुरी बोरफडी जरूड,घाटसावळी, ढेकनमोहा,पिंपळगाव मोची शिवार आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली,खरीप हंगामातील सर्वच पिकांची अतोनात

नुकसान झाली आहे,शेतात अजूनही पाणीच पाणी साचलेले असून कपाशीची बोन्ड सडून गेली आहेत,सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे,तुरीच्या शेंगा सडल्या आहेत ही विदारक परिस्थिती निदर्शनास आली, शेतकऱ्यांनी माजीमंत्री क्षीरसागर यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या,काही शेतकऱ्यांना तर अश्रू अनावर झाले होते,हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे,याच वेळी काही दिवसांपूर्वी मोहगीरवाडी येथे वीज पडून मोहरबाई राजेंद्र जाधव वय 40 वर्ष ही महिला दगावली तर दुसऱ्याच पुन्हा वीज पडून एका शेतकऱ्यांची म्हैस देखील दगावली आहे,माजीमंत्री क्षीरसागर यांनी तेथेही भेट देऊन मदतीचा प्रस्ताव दाखल असून दोन दिवसात 4 लाखाची मदत मिळणार असल्याचे सांगितले,परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांशी देखील तात्काळ सम्पर्क साधला,यावेळी अरुण डाके, गणपत डोईफोडे, विलास बडगे,गंगाधर घुमरे, सखाराम मस्के, बप्पासाहेब घुगे, ऍड राजेंद्र राऊत, शेख नसीर, अशोक घुमरे, अरुण लांडे, सचिन घोडके, बिडवे, तुषार घुमरे, नामदेव खांडेकर, बिबीशन खांडेकर,श्रीमंत पन्हाळे,कुटे महाराज बिभीषण घुगे अंकुश पन्हाळे, तुळशीराम घुगे, नवनाथ घोडके, सिद्धेश्वर घुगे, गोरख दंने, ऍड विष्णुपंत काळे,करांडे आदि उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button