आपला जिल्हा

कोरोना रुग्ण सापडण्याची मालिका सुरूच बीडमध्ये चार रुग्ण सापडले

बीडशहरात रुग्ण सापडण्याची सुरू असलेली मालिका खंडित व्हायला तयार नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बीडच्या छोटी राज् गल्लीमध्ये आज पुन्हा चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने बीडकरांचा चिंतेत भर पडली आहे.

सोमवारी सकाळी 67 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 63 जणांचे अहवाल निगेटिव्ह आली असून आज एकही अहवाल प्रलंबित राहिलेला नाही. या अहवालात चार जण कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. छोटी राज गल्लीमध्ये हे चारही रुग्ण सापडले असून यात 38 वर्षीय महिला पुरुष व 27 वर्षीय युवकाचा समावेश आहे तर दहा वर्षाचा मुलगा देखील कोरोना बाधित झाला आहे. आज जिल्हा रुग्णालयातून दोन रुग्णांना घरी पाठवण्यात आले तर बीडमध्ये आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 116 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 32 औरंगाबादेत रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close