आपला जिल्हा

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची कोरोनावर यशस्वी मात; रुग्णालयातून सुट्टी

बीड जिल्हा आनंदला, समर्थकही खुश

बीडसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेत होते. दोन दिवसापूर्वी त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुट्टी देण्यात आली. दरम्यान त्याचे खाजगी स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक व एका अंगरक्षकासही सुट्टी देण्यात आली आहे.

 

अकरा दिवसापूर्वी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना व त्यांच्या सोबत असलेल्या स्वीय सहाय्यक वाहन चालक अंगरक्षकास कोरोना असल्याचे उघडकीस आले होते. मात्र यातील एकासही कोरोना ची लक्षणे दिसत नव्हती त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. स्वॅब टेस्ट पॉझिटिव आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close