आरोग्य व शिक्षण

गोव्यातील इंटरनॅशनल फॅशन वीक मध्ये तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनचा जलवा. Jalwa of Tulsi College of Fashion Design at the International Fashion Week in Goa

विद्यार्थिनींनी संधीच सोनं केलं; डिझायनर म्हणून भरारी

बीड — कॅट वॉकर्स इंडियन मोस्ट पॉप्युलर फॅशन कंपनी यांच्या वतीने दिनांक ७,८,९ ऑक्टोबर रोजी इंटरनॅशनल फॅशन वीक चे आयोजन संयोजक चार्ल्स विल्यम,पुर्वा बाराई यांनी केले होते. गोवा राज्यातील पणजी येथील जिमखाना येथे सदरील फॅशन वीक पार पडले. या फॅशन शो साठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड यांच्यासह भारतातील विविध ठिकाणचे फॅशन प्रेमी सहभागी झाले होते.

कॅट वॉकर्स इंडियन मोस्ट पॉप्युलर फॅशन कंपनीने आयोजित केलेल्या फॅशन वीक मध्ये तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या बारा विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे ड्रेस डिझाईन केले होते. यानिमित्ताने त्यांनी आपल्या कला कौशल्याला इंटरनॅशनल दर्जावर पोहोचवण्याचे काम केले आहे. स्वतः संयोजकांनी तुलसीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेले ड्रेस परिधान करून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.यावेळी पुर्वा बाराई म्हणाल्या की,आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही कॉलेजला संधी दिली नाही. मात्र तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड यांना आम्ही संधी दिली आणि त्या संधीच विद्यार्थिनींनी सोनं केलं आहे. विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारचे ड्रेस डिझाईन करून आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे पुर्वा बाराई म्हणाल्या. यापुढेही तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड सोबत आम्ही काम करण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.या फॅशन वीक मध्ये प्रा.अश्विनी शंकर बेद्रे,प्रा.पायल विनोद राठोड,जोगदंड रंजना बंडू, गायकवाड दीक्षा शिवाजी,अर्चना अशोक साळवे,मस्के प्रतीक्षा किसन, कांबळे निशा सदाशिव, हिंगसपुरे धनश्री पंडितराव, श्वेता राजू वंजारे, अपेक्षा शामसुंदर वाघमारे, वैष्णवी दिगंबर अंकुशे, प्रतीक्षा उद्धव सोनवणे, कोमल महादेव अडागळे या विद्यार्थिनी सहभाग नोंदविला होता.इंटरनॅशनल फॅशन वीक मध्ये तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.खूप कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारचे ड्रेस डिझाईन करून गोव्यातील इंटरनॅशनल फॅशन वीक मध्ये सदरील ड्रेस डिझाईन चांगल्या प्रकारे प्रस्तुत केल्याबद्दल प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी विद्यार्थिनींना शाबासकी दिली आहे.सहभागी विद्यार्थिनींना संयोजक चार्ल्स विल्यम,पुर्वा बाराई यांनी सहभाग प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button