आपला जिल्हा

सोयाबीन बोगसगिरी प्रकरणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही — कृषी मंत्री दादाजी भुसे

बीडज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बीयाने पेरले मात्र उगवलेच नाही , अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शासन योग्य तो निर्णय तात्काळ घेईल. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मी होऊ देणार नाही . असे आश्वासन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी सांगितले आहे .

रिक्त पदेही भरणार-एकंदरीत बीड जिल्ह्यातील कृषी विभागात वर्ग 2 व 3 प्रवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत ही पदे भरण्याच्या संदर्भाने देखील आम्ही सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले .

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले होत . यावेळी ते म्हणाले की , शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये , सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे . अशा परिस्थितीत बळीराजा पिचला जाऊ नये यासाठी मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे . औरंगाबाद मध्ये ‘ नायक स्टाईल ‘ केलेल्या कारवाई संदर्भातही त्यांनी यावेळी सांगितले . पुढे बोलताना ते म्हणाले की यावर्षी सोयाबीन बियाणे अनेक शेतकऱ्यांनी पेरले पण उगवले नाही अशा तक्रारी आहेत .यासंदर्भात चौकशीचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत . ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पेरले मात्र उगवलेच नाही अशा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही असा विश्वास मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close