आरोग्य व शिक्षण

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. Scholarship Scheme for Students from Economically Weaker Section (NMMS) Exam Schedule Announced

पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी भरावेत – मनोज जाधव

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी वार्षिक बारा हजार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

बीड — महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते या करीता परीक्षेचे आयोजन दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांना दि. १० ऑक्टोबर २०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर करता येणार आहे. अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ही परीक्षा यंदा १८ डिसेंबर रोजी होणार आहे. तसेच एनएमएमएस परीक्षेद्वारे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असे. आता शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे .राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यातील विविध केंद्रावर १८ डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. देश पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. या कोट्यानुसार राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या परीक्षेचा निकाल साधारणत: फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, तेव्हा पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी भरवेत असे आवाहन मनोज जाधव यांनी केले आहे.

एनएमएमएस’ परीक्षेचे वैशिष्ट्ये –

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून होणार

– परीक्षेसाठी विषय : बौद्धिक क्षमता चाचणी (९० गुण आणि ९० प्रश्न), शालेय क्षमता चाचणी (९० गुण आणि ९० प्रश्न)

– मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड सात माध्यमात होणार परीक्षा

कोणते विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरू शकतात

१)महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

२) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत
असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन
२०२१-२२ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला असलेले विद्यार्थी

३)विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा, (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेलाअसावा.

विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली.

(एनएमएमएस) परीक्षे’साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली आहे. पूर्वी दीड लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत होती. आता पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. आता साडे तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button