आरोग्य व शिक्षण

कोरोनावर आले आणखी एक औषध, Covifor ‘गेमचेंजर’ ठरणार

नवी दिल्लीभारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णांचा एकूण आकडा हा ४ लाखांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. ग्लेनमार्क फार्मा अँटीव्हायरल फेविपिरावीर हे औषध बाजारात आणणारा आहे. आता यानंतर औषध कंपनी Hetero करोनावरील उपचारासाठी अँटीव्हायरल औषध रेमडेसिवीर (Remdesivir) लाँच करणार आहे. रविवारी कंपनीने ही माहिती दिली. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) मंजुरी दिली आहे. हे औषध ‘Covifor’ नावाने बाजारात विकले जाईल. 

Covifor गेमचेंजर ठरेल, कंपनीचा दावा

करोनाचे संशयित रुग्ण आणि करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हे औषध वापरण्यास डीजीसीआने परवानगी दिली आहे. यासोबतच करोनाच्या गंभीर रुग्णांनाही हे औषध देता येणार आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने Covifor औषधाला मंजुरी मिळाल्याने हे औषध गेमचेंजर ठरेल. या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या अतिशय सकारात्मक आल्या आहेत. देशभरातील करोना रुग्णांना हे औषध त्वरीत देण्यास कंपनीने तयारी केली आहे, असं Hetero ने म्हटलंय. औषधाची किंमत मात्र स्पष्ट झालेली नाही. 

100mg इंजेक्शनच्या स्वरुपात औषध

Covifor औषध हे 100mg इंजेक्शनच्या स्वरुपात उपलब्ध होईल. डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत हे इंजेक्शन रुग्णाला द्यावं लागेल. कंपनीने यासाठी अमेरिकेतील Gilead Sciences Inc या कंपनीशी करार केला आहे. यामुळे करोनावरील उपचार विस्तारता येईल. सध्याच्या गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी औषधाचा आवश्यक पुरवठा करण्यास तयार आहे, असं Hetero कंपनीच्या प्रमुखांनी सांगितलं. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close