शिंदे सरकारने बीडच्या शेतकऱ्यांचाही घात केला. The Shinde government also betrayed the farmers of Beed

बीड — जनहितासाठी आम्ही सत्तेचा डाव मांडला असं शिंदे सरकार सांगत असलं तरी बीडच्या शेतकऱ्यांच्याही पाठीत तलवारीने वार करण्यात कुठलीच कसर सरकारने सोडली नसल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गोगलगायींनी पीक नष्ट केलं,अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला तरी 17 लाखाची मदत जाहीर करून जखमेवर मीठ चोळलं आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतीची ढाल होऊन पाठीशी उभा राहिला पाहिजे होते उलट शेतकऱ्यांच्या पाठीत तलवारीने वारच केल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज 755 कोटींची मदत जाहीर केली आहे, मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमधून केवळ 17 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. याआधीही अतिवृष्टी व गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीची आकडेवारी पाहता नव्या राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा विक्रम केला आहे.अशा परिस्थितीत आमच्या शेतकरी बांधवांनी दिवाळी कशी साजरी करावी?
माजी मंत्री आ.धनंजय मुंडे
शिंदे सरकार ने बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झालं.राज्याची परिस्थिती अस्थिर झाली शेतकऱ्यांना वाली उरलाच नाही.परिणामी आत्महत्यांच सत्र थांबायचं नाव घेत नाही. सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हितासाठी आम्ही बंड केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिमकी वाजवली.पण राज्यातील अनेक जिल्ह्यात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालीच नाही. शेतकऱ्यांना दिलासा देत आहोत असं सांगत महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना जून जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या परंतु पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी
आज मदतीपोटी राज्य सरकारने 755 कोटी रुपयांची आर्थिक मदत शासन निर्णयाद्वारे घोषित केली आहे. या 9 जिल्ह्यांच्या यादीत बीड जिल्ह्याचाही समावेश आहे, मात्र 755 कोटींपैकी बीड जिल्ह्यातील 160 शेतकरी बाधित असल्याचे दाखवत केवळ 17 लाख रुपयांची मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घोषित करत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. यापूर्वी देखील अतिवृष्टी नुकसानी पोटी 3500 कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने घोषित केले होते त्या मदतीतून बीडचा शेतकरी वगळण्यात आला.सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी देखील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती सरकार दरबारी मांडली नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन केली त्याकडे शिंदे गटाचा अथवा भाजपाचा एकही नेता फिरकला नाही. दोघांनीही शेतकरी वाऱ्यावर सोडल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे विम्याचा 25% आग्रीम मिळावा यासाठी अधिसूचना काढण्यात आली.मात्र विमा कंपनीने देखील मुजोरपणा दाखवत अग्रीम देण्यास टाळाटाळ केली. शिंदेंच्या सरकारने
गोगलगायींनी नुकसान केलेल्या पिकांसाठी सरकारने तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 95 कोटी रुपये मदत घोषित कली, त्यातही बीड जिल्ह्यातील बाधित क्षेत्र कमी दाखवण्यात आले व केवळ 5 कोटी रुपये मदत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली. सध्या बीड जिल्ह्यातील शेतकरी आसमानी संकटासोबतच सुलतानी संकटाबरोबर झुंज देत आहे.यातून निराश झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.गोगलगायी मुळे दुबार पेरणीची अनेकांवर वेळ आली. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झालं नाही.सोयाबीन बऱ्यापैकी आलं तर ते रोग राईने पछाडलं त्यातच पुन्हा महिनाभर पावसाने पाठ फिरवली. हातात तोंडाशी घास येतो ना येतो तो अतिवृष्टीने हिरावला.शेतकरी पुन्हा शिंदे शाही च्या तुगलकी कारभाराने राजकीय जात्यात भरडून आता भरडून काढला जाऊ लागला आहे.17 लाखाची मदत देऊन आता दुखावरची खपली काढत जखम ओली करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या सरकारने केला आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये शिंदे सरकार विरोधात प्रचंड संतप्त भावना उमटू लागल्या आहेत.