ताज्या घडामोडी

Excitement in the police force! A missing employee was found after sending a suicide message to the SP पोलीस दलात खळबळ! आत्महत्येचा एसपींना मेसेज करुन गायब झालेला कर्मचारी सापडला

बीड — शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी अपमानास्पद वागणूक दिली.यामुळे आपण व्यथित झालो असून आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पोलीस अधीक्षकांना पाठवत पोलीस कर्मचारी गायब झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली होती. पोलिसांनी तात्काळ शोधा शोध करत कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप व पोलीस कर्मचारी शरद पवार यांची एका गुन्ह्याच्या संदर्भात चर्चा करताना शाब्दिक चकमक झाली. यावेळी रवी सानप यांनी पोलीस कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली. आपल्याच अधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिलेली सहन न झाल्याने शरद पवार यांनी चक्क पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाच आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. या मेसेज मध्ये त्यांनी मी गुन्ह्याच्या फाईलवर सही घेण्यासाठी पी आय रवी सानप यांच्याकडे गेलो असता त्यांनी शिवीगाळ केली तसेच आईजी साहेब व एस पी साहेब यांच्याकडे तक्रार करतो तुझ्याकडे बघून घेतो तुझे सीट खराब करतो असे म्हणून माझी खोटी नोंद डायरीला केली आहे त्यामुळे मी व्यथित होऊन आत्महत्या करत असल्याचं म्हटलं दरम्यान हा मेसेज बाहेर समजताच एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी शरद पवार यांचा शोध सुरू करण्यात आला शोधा शोध केल्यानंतर सहा-सात तासाच्या प्रयत्नानंतर शरद पवार या पोलीस कर्मचाऱ्यास सापडण्यात पोलिसांना यश आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button